शेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट

 बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. 

Updated: Jun 13, 2016, 08:33 PM IST
शेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. 

घटस्फोटासाठी कधी केला अर्ज...

२०१४मध्ये दोघांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या दरम्यान अनेक वळणं दोघांच्या आयुष्यात आणि या केसमध्ये आले. प्रकरण मुलांच्या कस्टडीवरून चिघळले होते.  या वादाला दोघांच्या सहमतीने एप्रिल महिन्यात पूर्णविराम मिळाला. सुप्रीम कोर्टात झालेल्या कॉप्रमाइजमध्ये दोघांनी संमतीने वेगळे होऊन मुलांची कस्टडी करिष्माला देण्यात आली. 

मुलांना किती रुपये मिळणार...

घटस्फोटानंतर मुलांच्या नावाने १० कोटी रुपयांचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्याचे दर महिन्याला दहा लाख रूपये व्याज मिळणार आहे. करिष्मा आता ज्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहते तो तिच्या नावावर करण्यात आला आहे. 

मुलांची कस्टडी कोणाकडे....

दोन्ही मुलं समायरा आणि कियान करिष्माकडे राहणार आहेत. त्या दोघांना भेटण्याचा अधिकार संजयला देण्यात आला आहे. वर्षभरात दोन ते तीन वेळा संजय मुलांना भेटू शकतो. 

कधी झाला होता विवाह...

करिष्मा आणि संजय यांचा विवाह २९ सप्टेंबर २००३ मध्ये झाला होता. संजयचा हा दुसरा विवाह होता. २०१२मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर करिष्मा आपली आई बबितासह मुंबईत राहत होती. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.