मुंबई : नसरुद्दीन शाहच्या इमाद आणि विवान या दोन मुलांना तुम्ही अनेक ठिकाणी फोटोंतून पाहिलं असेल... पण, याच नसरुद्दीन शाह यांना या दोन मुलांपेक्षा मोठी एक मुलगीही आहे... हीबा तिचं नाव... पण, हीबा हिला नसरुद्दीननं अनेक वर्षांपर्यंत आपली मुलगी मानण्यासही नकार दिला होता.
आपल्या आयुष्यातील हेच ढळढळीत सत्य नसरुद्दीन शाह यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडलंय. या पुस्तकातून त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना ज्या त्यांनी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आत्तापर्यंत दडवून ठेवल्या होत्या, आता सार्वजनिक झाल्यात.
‘अॅन्ड देन वन डे – अ मेमुआर’मध्ये नसरुद्दीन यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड आणि स्वीकारही केल्यात.
नसरुद्दीनसाठी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या परवीनसोबत प्रेमसंबंध आणि त्यातून मुलगी हीबाचा जन्म शब्दांमध्ये मांडणं किती कठिण असेल याची जाणीव होते.
एके ठिकाणी ते लिहितात, ‘मला माहित नाही कसं वाटेल, जेव्हा मी म्हणेल की मला माझीच मुलगी हीबा हिच्याबद्दल अनेक वर्षांपर्यंत काही जाणीवदेखील नव्हती. पण, मी ही गोष्ट स्वीकार करणं आज जरुरी आहे की, ती खरंच कुठेही नव्हती... माझ्यासाठी तिचं अस्तित्वच नव्हतं’
पण, आज प्रामाणिकपणे या गोष्टी मान्य करताना नसरुद्दीननं आईचं प्रेम, वडिलांसोबतचं तणावपूर्ण नातं, पहिलं प्रेम, पहिलं लग्न आणि अस्तित्वच नाकारलेल्या मुलीबद्दल लिहिलंय.
एक लाख शब्दांमध्ये आणि ३१५ पानांचं या आत्मचरित्रात त्यांचा अभिनय, प्रयोग, यश, अपयश, रत्ना पाठक शाह यांच्याबरोबर विवाह आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यातला प्रवास त्यांनी व्यक्त करून आपल्या मनावरचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न केलाय. शक्य होईल तितकं प्रामाणिक होण्याचा मी प्रयत्न केलाय, असं नसरुद्दीननं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.