बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख विकला जातो- नेहा धुपिया

'जूली', 'शीशा', 'सिंह इज किंग', 'चुप चुप के', 'मिथ्या', 'दसविदानिया' आणि 'फंस गए रे ओबामा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव केलेली बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो. 

Updated: Oct 6, 2014, 05:19 PM IST
बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख विकला जातो- नेहा धुपिया title=

नवी दिल्ली : 'जूली', 'शीशा', 'सिंह इज किंग', 'चुप चुप के', 'मिथ्या', 'दसविदानिया' आणि 'फंस गए रे ओबामा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव केलेली बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो. 

गेल्या काही दिवसांपासून नेहाने बॉलिवुडशी संबंध ठेवला नव्हता. पण आता १० ऑक्टोबरला नेहाचा "इक्कीस तोपों की सलामी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या कॉमेडी चित्रपटात नेहासोबत अनुपम खेर, दिव्येंदु शर्मा आणि मनु ऋषि चड्‌ढा प्रमुख भूमिकेत आहे. 
नेहाने या मुलाखतीत सांगितले की, "समाज सुधारणेचा संदेश देणारे चित्रपट मी करणार नाही. मसाला चित्रपट करून खासगी आयुष्यात समाज सेवा करणार कारण माझ्या स्टार व्हॅल्यूने लोक माझे म्हणणे ऐकतील. 

खान स्टार्ससोबत काम न करण्याच्या प्रश्नावर नेहाने मस्करी करत म्हटले की मी त्यांच्यापेक्षा खूप उंच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.