...म्हणून सोसायटीनं या अभिनेत्रीला घराबाहेर काढलं!

टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमात त्याच्यासोबत डेब्यु करणार आहे एक नवीन अभिनेत्री... निधी अग्रवाल... ही निधी सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

Updated: May 16, 2017, 11:18 PM IST
...म्हणून सोसायटीनं या अभिनेत्रीला घराबाहेर काढलं! title=

मुंबई : टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमात त्याच्यासोबत डेब्यु करणार आहे एक नवीन अभिनेत्री... निधी अग्रवाल... ही निधी सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

निधी हिला तिच्या घरातून सोसायटीनं बाहेर काढलंय. मुंबईतल्या वांद्रे परिसकरात राहणाऱ्या निधीला ती 'सिंगल' आहे... म्हणून सोसायटीनं बाहेर काढलंय. शिवाय एकटी मुलगी आणि तीही सिनेमांत काम करणारी, या गोष्टीवरही सोसायटीचा आक्षेप आहे. 

या घरात निधी आपल्या एका फ्रेंडसोबत राहत होती. सोसायटीतल्या नागरिकांना 'सिंगल मुलगी' तिथं राहणं पसंत नव्हतं... तसंच त्यांनी सिनेक्षेत्रात काम करणाऱ्यांना घर न देण्याचा निर्णय घेतलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, मेट्रोपॉलिटन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मॅरिटल स्टेटस, लिंग, खाणं-पिणं, धर्म, जात अशा वेगवेगळ्या कारणांवरून घरं नाकारण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.