मुंबई : आता बिग बॉसमध्ये असं काही होणार आहे जे यापूर्वी कधी झाल नाही. या शोच्या १०व्या सीजनमध्ये सामान्य लोकांनाही बिग बॉसमध्ये सहभागी होता येणार आहे. नवव्या सीजनपर्यंत केवळ सेलिब्रेटीजना या शोमध्ये भाग घेता येणार आहे.
कलर्स चॅनलचे सीईओ राज नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला या सीझनमध्ये नवा प्रयोग करायचाय. यात डॉक्टरपासून ते हमाल असलेले सामान्य लोक सहभागी होऊ शकणार आहेत. त्यांचे आर्थिक अथवा सामाजिक बॅकग्राऊंड काय आहे याचा शोशी काही संबंध असणार नाही.
या शोमध्ये सहभाग घेऊ इच्छिणारे www.colorstv.com/biggbossentry यावर आपला व्हिडीओ अपलोड करु शकतात. २३ जानेवारीपासून एंट्री सुरु होणार असून ३१ मार्चपर्यंत शोमध्ये सहभागी होऊ शकता.