पाकिस्तानी अभिनेत्रीचे बॉलीवू़डवर गंभीर आरोप

पाकिस्तानी अभिनेत्री आणि क्वीन या चित्रपटात काम केलेल्या सबीका इमाम हिने मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये येण्यासाठी खूप काही झेलावं लागतं असं म्हटलं आहे. 

Updated: Dec 29, 2015, 04:17 PM IST
पाकिस्तानी अभिनेत्रीचे बॉलीवू़डवर गंभीर आरोप title=

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री आणि क्वीन या चित्रपटात काम केलेल्या सबीका इमाम हिने मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये येण्यासाठी खूप काही झेलावं लागतं असं म्हटलं आहे. 

मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी रडतांना आणि हतबल होतांना मी पाहिलं आहे. एवढंच नाही तर काही मुस्लिम मुलींचं शोषणही होतं आहे. असा गंभीर आरोप सबीकाने बॉलीवूडवर केला आहे.

क्वीनमध्ये केलेली भूमिका तिला ऑफर केली गेली नव्हती. त्यासाठी तिने खूप चांगलं ऑडिशन दिलं होतं. ती लहान असतांना तिने पोल डान्स शिकला होता म्हणून तिने ही भूमिका केली असंही तिचं म्हणणं होतं.

क्वीनमध्ये केलेल्या या डान्सबाबत तिचावर अनेकांनी टीका केली होती पण, जर तिने हा रोल नसता केला तर ती बॉलावूडमध्ये कधीच येऊ शकली नसती. असंही तिने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.