अमेरिकेतही सैराटचा फिव्हर

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने भारतातील नव्हे तर भारताबाहेरच्या लोकांनाही झिंगायला लावलंय. प्रत्येक थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक बेभान होऊन नाचले.

Updated: Jun 11, 2016, 02:49 PM IST
अमेरिकेतही सैराटचा फिव्हर title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने भारतातील नव्हे तर भारताबाहेरच्या लोकांनाही झिंगायला लावलंय. प्रत्येक थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक बेभान होऊन नाचले.

याला अपवाद अमेरिकेतील थिएटरचाही नव्हता. अमेरिकेतील थिएटरर्समध्येही सैराटचे शो दाखवण्यात आले आणि याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसादही दिला. 

कोलारॅडोच्या डेनवर येथील थिएटरमध्येतर झिंगाट या गाण्याने प्रेक्षकांना वेडच लावलं. तेथील प्रेक्षकही या गाण्यावर वेड्यासारखे नाचले.