'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Updated: Apr 2, 2016, 08:54 PM IST
'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार' title=

मुंबई: बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

प्रत्युषाच्या आत्महत्येवरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणावरून राहुलची आई डॉ. शिवानी सिंग यांनी प्रत्युषाच्या घरच्यांना टार्गेट केलं आहे. प्रत्युषाचे कुटुंबिय याला जबाबदार असल्याचा आरोप शिवानी सिंग यांनी केला आहे. 

कोट्यवधी रुपये कमावणारी प्रत्युषा तणावामध्ये असायची, प्रत्युषाचं आणि तिच्या आईचं मुंबईच्या कांदिवलीतल्या आयसीआयसीआय बँकमध्ये जॉईंट अकाऊंट होतं. या अकाऊंटमधून 4 कोटी रुपये तिच्या घरच्यांनी काढले, त्यामुळे प्रत्युषा तणावात होती, असा दावा राहुलच्या आईनं केला आहे.