VIDEO : प्रियांका म्हणते, सनीसोबत फोटो... नको रे बाबा!

पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिच्याशी अनेक बॉलिवूड कलाकारांचे चांगले संबंध आहेत पण, उघडउघडपणे हे संबंध व्यक्त करण्यात मात्र ते थोडे कचरताना दिसतात. असाच एक प्रसंग नुकत्याच झालेल्या स्टार गिल्ड अवॉर्डस दरम्यान पाहायला मिळाला. 

Updated: Dec 25, 2015, 03:48 PM IST
VIDEO : प्रियांका म्हणते, सनीसोबत फोटो... नको रे बाबा! title=

मुंबई : पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिच्याशी अनेक बॉलिवूड कलाकारांचे चांगले संबंध आहेत पण, उघडउघडपणे हे संबंध व्यक्त करण्यात मात्र ते थोडे कचरताना दिसतात. असाच एक प्रसंग नुकत्याच झालेल्या स्टार गिल्ड अवॉर्डस दरम्यान पाहायला मिळाला. 

या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री प्रियांका चोपडा आणि सनी लिओन समोरासमोर आल्या. दोघांनी एकमेकींची गळाभेटही घेतली... पण, फोटोग्राफर जेव्हा या दोघींचे एकत्र फोटो काढत होते तेव्हा मात्र प्रियांकानं 'इसके साथ तो तस्वीर मत लो यार' असं म्हटलेलं पाहायला मिळालं. 

यामुळे, सनी मात्र हैराण होत पाहत राहिली... त्यानंतर मात्र सावरत प्रियांकानं हसत हसत सनीसोबत एक पोझ दिली.... आणि मग थोड्यावेळ गप्पा मारत आपला रस्ता धरला.

पॉर्न स्टार अशी ओळख असलेल्या सनीनं आता बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलंय. सनीचा अडल्ट कॉमेडी असेलेला मस्तीजादे लवकरच प्रदर्शित होणार आहे... तर प्रियांकाचाही 'जय गंगाजल' प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.