सलमान खानला लकी आहे रेल्वे स्टेशन

 सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे स्टेशनचा सीन असतो. विशेष म्हणजे ज्या चित्रपटात रेल्वे स्टेशनचा सीन आहे. ते चित्रपट हीट झाले आहे. 

Updated: Jun 28, 2015, 09:25 AM IST
सलमान खानला लकी आहे रेल्वे स्टेशन  title=

मुंबई :  सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे स्टेशनचा सीन असतो. विशेष म्हणजे ज्या चित्रपटात रेल्वे स्टेशनचा सीन आहे. ते चित्रपट हीट झाले आहे. 

सलमानच्या 'तेरे नाम', 'वॉन्टेड', 'बॉडीगार्ड', 'दबंग', 'दबंग 2' आणि 'किक' या चित्रपटांनी यशाचे शिखऱ गाठले होते. या सर्व चित्रपटात रेल्वे स्टेशनचा एखादा सीन आहे. 

याचमुळे आता बजरंगी भाईजान या आपल्या आगामी चित्रपटात कबीर खानने आपला एक महत्त्वाचा सीन रेल्वे स्टेशनवीर चित्रीत केला आहे. आतापर्यंत सलमानला रेल्वे स्टेशन खूप लकी सिद्ध झाले आहे. त्यामुळे आगामी चित्रपटात रेल्वे स्टेशनचा सीन असल्याने हा चित्रपट ही होण्याची शक्यत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.