मुंबई: बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना यांचा आशीर्वाद बंगला पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वांद्र्यातल्या कार्टर रोड परिसरामध्ये असलेल्या या बंगल्याच्या पाडकाम गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु आहे.
2012 मध्ये राजेश खन्नांचं निधन झालं, त्यानंतर राजेश खन्नांच्या कुटुंबियांनी हा बंगला ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचे संस्थापक आणि अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी तब्बल 90 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं बोललं गेलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगल्याचे मालक शेट्टींना या ठिकाणी 4 मजली इमारत बांधायची आहे, त्यामुळे हे बांधकाम पाडण्यात येत आहे.
राजेश खन्ना यांनी 1960मध्ये आणखी एक लोकप्रिय अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून हा बंगला विकत घेतला होता.