मुंबई : एखाद्या ब्रेकअपची किंमत ही २१ कोटी असू शकते. असा आपण कधी केला ही नसेल पण हे सत्य आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला कॅटरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर २१ कोटींचा फटका बसला आहे.
अनेक वर्षापासून सुरू असलेली ही प्रेमकहाणी काही दिवसांपूर्वी संपूष्टात आली. ब्रेकअपच्या एक आठवड्या अगोदरच दोघांना टॅरेसवर किस करतांना पाहिलं गेलं होतं.
ब्रेकअप होऊ नये यासाठी दोघांनी प्रयत्न देखील केले पण याचा काहीच फायदा झाला नाही. दोघांनी ही आपला वेगवेगळा रस्ता धरला आहे. त्यामुळेच एका कार्यक्रमादरम्यान दोघंही खूप शांत-शांत दिसले.
रणबीर कपूरला या ब्रेकअपची किंमत २१ कोटी रूपये मोजावी लागली. रणबीर आणि कॅटरिना एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. दोघांनी खूपच सुंदरपणे हे घर सजवलं होतं.
ब्रेकअपनंतर रणबीरला फ्लॅट सोडावा लागला. या फ्लॅटचं भाडं होतं जवळपास १५ लाख रूपये. जे दोघं मिळून देत होते. पण डिपॉजिटची रक्कम होती २१ कोटी. जी रणबीर कपूरने भरली होती.