रणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?

अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत. 

Updated: Jan 12, 2015, 05:45 PM IST
रणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?

नवी दिल्ली: अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

'रॉय' आणि 'जग्गा जासूस'नंतर रणबीर 'तमाशा'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तो ही त्याची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत...

इम्तियाज अलीच्या या चित्रपटाच्या अखेरच्या शूटिंगसाठी या महिन्याअखेरीस ही लीड जोडी दिल्लीत जाणार आहे. 

यापूर्वी हे माजी प्रेमीयुगुल 'ये जवानी, है दिवानी' या चित्रपटात एकत्र दिसलं होतं. दोघांच्या जबरदस्त केमेस्ट्रीमुळे ही फिल्म जबरदस्त हीट ठरली होती.

आता 'तमाशा'मध्ये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसतेय. ते ही त्यांच्या ब्रेकअप नंतर... चित्रपटातील अनेक सीन्स शिमला आणि कॉर्सिका इथं शूट झालेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

About the Author