आपल्या घराचे फोटो काढल्यामुळे रणबीरची मीडियाला शिवीगाळ

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनची बातमी खूपच चर्चिली जात आहे. या प्रेमी युगुलाने नुकतेच एकत्र राहण्यासाठी कार्टर रोड येथे घर घेतले. परंतु, त्यांनी हे पब्लिकली स्वीकारले नाही की ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत.  

Updated: Nov 15, 2014, 06:49 PM IST
 आपल्या घराचे फोटो काढल्यामुळे रणबीरची मीडियाला शिवीगाळ title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनची बातमी खूपच चर्चिली जात आहे. या प्रेमी युगुलाने नुकतेच एकत्र राहण्यासाठी कार्टर रोड येथे घर घेतले. परंतु, त्यांनी हे पब्लिकली स्वीकारले नाही की ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत.  

अनेक वेळा हे प्रेमी युगुल एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रेम काहणीत सर्वात खास गोष्ट म्हणजे रणबीरला जेव्हा कधी मीडिया या रिलेशनबद्दल विचारले जाते तेव्हा रणबीरला राग येतो. 

आता रणबीर साहेबांना पुन्हा राग आला आहे. रणबीर आणि कतरिना जेव्हा आपल्या नव्या घरात शिफ्ट करत होते. त्यावेळी काही मीडियातील पत्रकारांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला . हे पाहून रणबीर भडकला आणि मीडिया कर्मचाऱ्यांना त्याने शिवीगाळ केली.  

रणबीर येवढ्यावर नाही थांबला त्यांने यानंतर मीडियाला तेथून हकलण्यासही सुरूवात केली. रणबीरने त्यांना तोपर्यंत हकलले जोपर्यंत ते त्या ठिकाणाहून गेले नाहीत. 

हे पहिले प्रकरण नाही की रणबीरने मीडियाला अशी वागणूक दिली आहे. यापूर्वी एकदा रणबीरला त्याच्या रिलेशनशीपबद्दल विचारले तेव्हा रणबीर म्हणाला, आपल्या कामाशी काम ठेव ना. असे असले तरी आम्हांला आशा आहे की, त्या दोघांची लव लाइफ नवे शिखर पादाक्रांत करतो आणि रणबीरने आपल्या रागावर थोडा कंट्रोल ठेवायला हवा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.