रितेश देशमुखचा हटके 'बॅंजो' लय भारी लूक!

अभिनेता रितेश देशमुख आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याचा हटके 'बॅंजो'  लूक लय भारी आहे. मात्र, हा मराठीत सिनेमा नसून तो हिंदी आहे.

Updated: Feb 17, 2016, 07:53 PM IST
रितेश देशमुखचा हटके 'बॅंजो' लय भारी लूक! title=
सौजन्य : झी टॉकीज

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याचा हटके 'बॅंजो'  लूक लय भारी आहे. मात्र, हा मराठीत सिनेमा नसून तो हिंदी आहे.

रवी जाधव आता 'बॅंजो' सिनेमाच्या माध्यमातून हिंदीत एंट्री करत आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आगामी मराठी चित्रपट 'फ़ुंतरु'च्या निर्मात्या क्रिशिका लुल्ला यांनीच 'बॅंजो’ची निर्मिती केलेय.

रवी जाधव सध्या 'बॅंजो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, या चित्रपटात 'लय भारी' फेम अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गिस फक्री यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. 

चित्रपटाची कथा, 'बॅंजो' वाजवणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण मुलाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. या सिनेमातून महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचे वेगळ्या पद्धतीने दर्शन घडणार आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली एकूण सहा गाणी, या चित्रपटात असणार आहेत.