रितेश देशमुखही आता 'महाराजां'च्या अवतारात!

बॉलिवूड गाजवल्यानंतर मराठमोळ्या रितेश देशमुखला आता मराठी चित्रपटसृष्टीनंही वेड लावलंय... 'लय भारी'नंतर आता रितेशचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. 

Updated: Aug 22, 2015, 08:13 PM IST
रितेश देशमुखही आता 'महाराजां'च्या अवतारात!

मुंबई : बॉलिवूड गाजवल्यानंतर मराठमोळ्या रितेश देशमुखला आता मराठी चित्रपटसृष्टीनंही वेड लावलंय... 'लय भारी'नंतर आता रितेशचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. 

महाराष्ट्राला शूरतेचे धडे देणाऱ्या 'छत्रपती शिवाजी' यांच्यावर आधारित याच नावाचा हा सिनेमाची निर्मिती दुसरं तिसरं कुणी नाही तर रितेशची पत्नी जेनेलिया करणार आहे.

या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका करण्याची संधी रितेशला मिळू शकते... त्याला या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही लागून राहिलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.