सचिनची मुलगी शाहरूखसोबत करणार बॉलिवूडमध्ये एंट्री?

ज्येष्ठ अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये लवकरच एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. श्रिया बॉलिवूडमध्ये शाहरूख खानचा चित्रपट 'फॅन'द्वारे एंट्री करेल. 

Updated: Mar 2, 2015, 06:41 PM IST
सचिनची मुलगी शाहरूखसोबत करणार बॉलिवूडमध्ये एंट्री? title=

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये लवकरच एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. श्रिया बॉलिवूडमध्ये शाहरूख खानचा चित्रपट 'फॅन'द्वारे एंट्री करेल. 

मनीष शर्मा यांच्या या फिल्म बाबत अद्याप जास्त काही माहिती मिळाली नाहीय. मात्र, श्रिया या चित्रपटाचा एक भाग असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. 

सूत्रांनुसार 'शाहरूख खान दिल्लीत या फिल्मचं शूटिंग करत आहे आणि श्रिया त्याच्या बरोबर आहे. श्रियाची भूमिका खूप छोटी आहे. पण महत्त्वाची असणार आहे. फिल्मशी निगडित सर्वच लोकांना चूप राहण्याचे आदेश देण्यात आलेत.'

श्रियानं ऑस्कर विजेता दिग्दर्शक क्लाउड लिलॉचची फिल्म 'अं प्लू यून'ला जानेवारीत शूट केलंय. श्रियानं २०१३मध्ये रिलीज झालेल्या 'एकुलती एक' चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटांमध्ये डेब्यू केला होता.

श्रियानं आपल्या करिअरची सुरूवात शॉर्ट फिल्म 'पँटेड सिग्नल' (२०१२) आणि ड्रेसवाला (२०१३) पासून केलीय. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्रियाच्या या चित्रपटांचं कौतुक झालं. गेल्यावर्षी इंग्रजी प्ले 'इंटरनल अफेअर्स'मध्येही तिनं काम केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.