सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

Updated: Jun 4, 2016, 05:49 PM IST
सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

८० कोटीहून अधिक कमाई करणारा सैराट मराठीतील पहिला चित्रपट ठरलाय. अनेक बॉलीवूड कलाकारांनीही सैराटचे कौतुक केलेय.

रितेश देशमुखने तर सैराटचे हे यश म्हणजे थ्री इडियट आणि धूम ३ला मिळालेल्या यशाइतकेच मोठे असल्याचे म्हटलेय. 

मला चित्रपट खूप आवडला. सैराट एक ग्रेट चित्रपट असण्याबरोबर त्याला मिळालेले व्यवसायिक यश मोठे आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठीत उत्तमोत्तम चित्रपट येतायत. केवळ त्यांची कथाच नव्हे तर व्यवसायिकदृष्ट्याही मराठी चित्रपटांना मोठे यश मिळतेय. मराठी चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जातायत ही अभिमानाची गोष्ट असे रितेश यावेळी म्हणाला. 

५०कोटीहून अधिक कमाई करणारा सैराट पहिला चित्रपट ठरलाय. प्रादेशिक चित्रपटाला हे इतके मोठे यश मिळणे ही मोठी गोष्ट आहे. सैराटचे हे यश धूम ३ आणि थ्री इडियटच्या यशाइतकेच मोठे आहे, असे पुढे रितेश म्हणाला.