मुंबई : अभिनेता समलाना खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यातील मैत्री संपल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटण्याचे टाळतात. मात्र, त्याचा असं झालं की, दोघे एकमेकांना भेटण्याचा प्रसंग आला.
सलमान आणि अमिताभ बच्चन यांचे काही फोटो व्हायरल झालेत. यातून असे वाटते की, दोघांमध्ये ऑल इज वेल, झाल्याचे दिसतेय. मात्र, तसं काहीही नाही. परंतु १३ वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या एका कार्यक्रमात प्रामुख्याने दिसलेत. मात्र, दोघांची बसण्याची व्यवस्था दूर करण्यात आली होती. मात्र, जे व्हायचे ते झालेच.
त्याचं असं झालं, ऐश्वर्या स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी आली तर सलमान आपला पुढचा परफॉर्मेस करण्यासाठी स्टेजच्या मागे तयारी करीत होता. यावेळी दोघांची येण्या-जाण्याच्यावेळी भेट झाली. मात्र, त्यांनी दोघांनी एकमेकांना हाय हॅलो केले ते काही माहित नाही. परंतु दोघांची नकळत भेट झाली हे खरं.