मुंबई : अभिनेता सलमान खान यानं त्याची एक्स गर्लफ्रेंड - अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यावर केलेल्या आपल्या एका कमेंटसाठी माफी मागतलीय.
त्याचं झालं असं की, सलमानची बहिण अर्पिता हिच्या लग्नात खेळीमेळीच्या वातावरणात सलमाननं कतरिनाचा उल्लेख 'कतरीना कपूर' असा केला होता. अशा पद्धतीनं पहिल्यांदाच सलमाननं कतरीना आणि रणबीरच्या रिलेशनशीपचा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख केला होता.
'मी तर तुला पूर्ण संधी दिली होती पण तू मात्र कतरीना खानऐवजी कतरीना कपूर बनणं पसंत केलंस...' असं सलमाननं अर्पिताच्या लग्नात म्हटलं होतं. यावरून, सलमान कतरीनाच्या बाबतीत गंभीर होता, ही बाब सगळ्यांच्याच लक्षात आली.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, आपली चूक लक्षात आल्यानंतर सलमाननं कतरीनाच्या घरी जाऊन तिची माफी मागितलीय. आपण अतिउत्साहात बोलून गेलो... पण, कुणाचीही टर उडवण्याची आपली त्यामागे भावना नव्हती, असंही सलमाननं म्हटलंय.
यानंतर, मात्र सलमानला आपला मेन्टॉर मानणाऱ्या कतरिनानं लगेचच आपल्या मनात सलमानबद्दल कोणतीही वाईट भावना नसल्याचं सांगत आश्वस्त केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.