मुंबई : यंदाच्या वर्षात सरकार दरबारी सर्वात जास्त कर जमा करणारा व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ओळखू शकता...?
आयकर विभागाच्या आत्तापर्यंतच्या अॅडव्हान्स टॅक्स पेमेंट डाटावर नजर टाकली असता, २०१५ या वर्षांत अभिनेता सलमान खान हा सर्वात जास्त कर भरणारा नागरिक ठरलाय... याबाबतीत त्यानं अक्षय कुमारलाही मागे टाकलंय.
२०१५ साली 'बजरंगी भाईजान'नं तब्बल २० करोड रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरलेत... तर अभिनेता अक्षय कुमारनं १६ कोटी अॅडव्हान्स टॅक्स दिलाय.
या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांची नावंही वरच्या क्रमांकावर आहेत.
रणबीर कपूरनं १५ कोटी तर शाहरुख खाननं १४ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरलाय. अमिताभ बच्चन यांनी ८.७५ करोड रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरलाय.
२०१५ या सालात ३१ डिसेंबर पर्यंत भरलेल्या टॅक्सची माहिती मुंबई इन्कम टॅक्स डिपार्टमेंटननं दिलीय.