मुंबई : सलमान खान आणि कॅतरीना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मात्र, यावेळी या चर्चेत अनुष्का शर्मा हिचे नाव जोडले गेले आहे. यावर्षी ईदच्यावेळी सलमानचा 'सुल्तान' हा सिनेमा रिलीज होत आहे. परंतु त्याच्यासोबत त्याची माजी प्रेमिका कॅतरीना काम करण्यासाठी उत्सुक होती. मात्र, ही संधी अनुष्का शर्माला मिळाली आहे.
रिपोर्ट्सनुसार सुल्तानसाठी कॅतरीनाने मुलाखतही केली होती. त्याशिवाय तिने सिनेमाच्या सेटवर दोन तास वेळ घालवला होता. तसेच प्रोडक्शन टीमबरोबर लीड रोड करण्याबाबत बोलणेही केले होते. मात्र, हा सिनेमा हरियाणाच्या भूमिवर होत आहे. त्यामिुळ कॅतरीनाला ही संधी मिळालेली नाही.
सलमानने अनुष्काला साईन केले. त्यामुळे हा कॅतरीना मोठा धक्का मानला जात आहे.