सोशल मीडियावर सलमानने केला कॅटरिना सोबतचा फोटो शेअर

सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील अभिनेत्री कॅटरिना सोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 

Intern Intern | Updated: Mar 23, 2017, 12:34 PM IST
सोशल मीडियावर सलमानने केला कॅटरिना सोबतचा फोटो शेअर title=

मुंबई: सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील अभिनेत्री कॅटरिना सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'टायगर जिंदा है' हा चित्रपट सलमानच्या २०१२ मधील 'एक था टायगर' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'एक था टायगर' हा चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता. तर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट अली अब्बास यांनी दिग्दर्शित करत आहे. ऑस्टेलियातील चित्रपटाच्या सेटचा फोटोही त्याने शेअर केला आहे.

सलमान खानच्या 'सुल्तान' या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. सलमानचा येणारा 'टायगर जिंदा है' हा नवीन चित्रपटही प्रेक्षकांमध्ये आपला ठसा उमटवू शकतो. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि कॅटरिनामध्ये काही दिवसांपूर्वी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा रंगल्या. पण त्यानंतर सलमान आणि कॅटरिनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.