"प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी

"प्रेम रतन धन पायो" याने इतिहास अनेक दृष्टीने रचला. पण शाहरूख खानच्या 'हॅपी न्यू इअर' पेक्षा जास्त गल्ला जमविण्यात सलमानचा हा चित्रपट मागे पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज होऊ या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात गल्ला जमविल्याचा रेकॉर्ड बनिवला आहे. 

Updated: Nov 13, 2015, 09:33 PM IST
"प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी

मुंबई : "प्रेम रतन धन पायो" याने इतिहास अनेक दृष्टीने रचला. पण शाहरूख खानच्या 'हॅपी न्यू इअर' पेक्षा जास्त गल्ला जमविण्यात सलमानचा हा चित्रपट मागे पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज होऊ या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात गल्ला जमविल्याचा रेकॉर्ड बनिवला आहे. 

सोनम कपूर हिने भविष्यवाणी केली होती की सलमानच्या या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ओपनिंग मिळणार आहे. त्यानुसारच ४०.३५ कोटींचा पहिल्या दिवशी गल्ला जमविला. या संदर्भात अनेक वक्तव्य समोर येत आहे. काही जण म्हणताहेत सलमानच्या चित्रपटाने ४२ कोटी रूपये कमाविले आहे. 

"प्रेम रतन धन पायो"ने पहिल्या दिवशीच्या कमाईत  सलमानच्या सर्व चित्रपटांचे विक्रम तोडले आहेत. यापूर्वी बजरंगी भाईजानने पहिल्या रविवारी ३८ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण "प्रेम रतन धन पायो"ने गुरूवारीच ४०.३५ कोटी रूपयांची कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

यापूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी रिलीज झालेल्या शाहरूख खानच्या 'हॅपी न्यू इअर'ने ४४.९७ कोटींची कमाई केली होती. सलमानचा हा "प्रेम रतन धन पायो" चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला पण त्याला शाहरूखचा रेकॉर्ड तोडता आला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.