संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा सुट्टी हवीय. संजय दत्तनं कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.  

Updated: Jun 16, 2015, 12:15 PM IST
संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज title=

पुणे: तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा सुट्टी हवीय. संजय दत्तनं कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.  

१९९३ मधील मुंबई बाँबस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. १६ मे २०१३ रोजी संजय दत्तची येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत तब्बल ११८ दिवस तो पॅरोल किंवा फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर राहिला होता. 

या प्रकारावर चोहोबाजूंनी टिका होत आहे. मात्र आता पुन्हा एकदा संजय दत्तनं १४ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.