मुंबई : सलमानला ‘शालीन आणि विनम्र’ असल्याची पावती अभिनेता शाहरुख खानकडून मिळालीय.
एकमेकांपासून चार हात लांब राहणारे हे दोन अभिनेते, एकमेकांबद्दल चांगलं बोलायला लागल्यापासून अनेक वेळा चर्चेत आलेत.
दोन्ही सुपरस्टर ‘खान’मधलं तथाकथित वॉर आता संपुष्टात येत असल्याचीच ही चिन्हं असल्याचं त्यांच्या चाहत्यांना वाटतंय.
त्याचं झालं असं की, सलमाननं नुकतंच तो होस्ट करत असलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन – ८’ मध्ये आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’चं प्रमोशन करण्यासाठी शाहरुखला खुल्या मनानं आमंत्रण दिलं होतं... याबद्दल, शाहरुखला विचारलं गेलं तेव्हा शाहरुखनं हा मार्केटींग आणि प्रोडक्शनचा भाग असल्याचं सांगतलंय. या टीम्सकडून आम्हाला जे करायला सांगितलं जातं ते आम्ही करतो, असं शाहरुखनं म्हटलंय.
यानंतर शाहरुख म्हणतो, प्रत्येक जण खूप शालीन आणि विनम्र असतो तसाच ‘सलमान भाई’ही आहे. आम्हाला चांगलंच वाटलं जेव्हा त्याला या शोमध्ये आम्हीही यावं असं वाटलं. जर, आमच्याकडे वेळ असेल आणि शक्य असेल तर आम्ही निश्चितच तिथं जाऊन.
माझ्या मते, आमच्या सिनेमाबद्दल बोलणं हे बिग बॉसचं मोठेपण आहे, असंही शाहरुखनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.