पुन्हा जवळ आले शाहरूख आणि सलमान, खास तिच्यासाठी!

सलमान खान आणि शाहरूख खान पुन्हा एकदा एकत्र आलेत. दोन्ही खान एकत्र दिसले. सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नासाठी शाहरूख मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पोहोचले. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये शाहरूखनं सलमानच्या कुटुंबाची भेट घेतली. रविवारी रात्री सलमानच्या बहिणीची मेंहदींची रस्म होती. 

Updated: Nov 17, 2014, 11:20 AM IST
पुन्हा जवळ आले शाहरूख आणि सलमान, खास तिच्यासाठी! title=

मुंबई: सलमान खान आणि शाहरूख खान पुन्हा एकदा एकत्र आलेत. दोन्ही खान एकत्र दिसले. सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नासाठी शाहरूख मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पोहोचले. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये शाहरूखनं सलमानच्या कुटुंबाची भेट घेतली. रविवारी रात्री सलमानच्या बहिणीची मेंहदींची रस्म होती. 

यापूर्वी एका कार्यक्रमात शाहरूखनं म्हटलं होतं, की सलमानच्या बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी त्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाहीय. कदाचित हेच पटवून देण्यासाठी शाहरूख रविवारी रात्री सलमानच्या घरी पोहोचले.  

दोघांनी अर्पितासोबत फोटो काढला. म्हणतात ना, एक फोटो हजारो शब्द समजावून सांगतात. सलमानचं तर बहिण अर्पितावर खूप प्रेम आहे, पण शाहरूख सुद्धा अर्पिताचा फॅन आहे. सलमान आणि शाहरूखनं अर्पितासोबत काढलेला हा फोटो अतुल अग्निहोत्रीनं ट्विटरवर टाकलाय.  

शाहरूख सलमानच्या घरी जवळपास दोन तास थांबला. सलमाननं शाहरूखचा भरपूर पाहूणचारही केला. अर्पिता हैदराबादमध्ये १८ नोव्हेंबरला दिल्लीतील व्यावसायिक आयुष शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सलमाननं आपल्या बहिणीच्या लग्नासाठी हैदराबाद इथलं रॉयल फलकनुमा हे शाही हॉटेल बुक केलंय. तर लग्नाचं रिसेप्शन २१ नोव्हेंबरला मुंबईत आहे. रिसेप्शनमध्ये हाय-प्रोफाईल इव्हेंट होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.