मुंबई : प्लास्टिक सर्जरीनं तुम्हाला तुमचं संपूर्ण रुप पालटता येऊ शकतं, हे तुमच्यापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांतून पोहचलं असेलच... आता श्रीदेवीला पाहून तुमचा यावर विश्वास बसू शकेल.
अभिनेत्री श्रीदेवी नुकतीच युरोपहून मुंबईत परतलीय. यावेळी ती अवघ्या १८ वर्षांची दिसत होती. उल्लेखनीय म्हणजे, श्रीदेवी सध्या ५२ वर्षांची आहे.
लेझर स्कीन सर्जरीच्या माध्यमातून श्रीदेवीनं ही किमया साधलीय. सिलिकॉन ब्रेस्ट करेक्शन, बोटॉक्स आणि चेहरा उठावदार करण्याच्या इतर शस्त्रक्रियांही तिनं केल्यात, अशी माहिती mtinews.in या बेवसाईटनं ही दिलीय.