व्हिडिओ : जेव्हा अंकिता सुशांतला म्हणाली 'आय लव्ह यू गुग्गू'

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा जरी ब्रेक अप झाला असला... तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांचा हा निर्णय फारसा रुचलेला नाही. 

Updated: Jun 25, 2016, 05:33 PM IST
व्हिडिओ : जेव्हा अंकिता सुशांतला म्हणाली 'आय लव्ह यू गुग्गू' title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा जरी ब्रेक अप झाला असला... तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांचा हा निर्णय फारसा रुचलेला नाही. 

या दोघांना पुन्हा प्रेमाने एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना प्रत्यक्षात कधी मिळणार हे माहीत नाही... परंतु, एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये मात्र ही संधी या दोघांच्याही चाहत्यांना मिळाली होती. 

एका नॅशनल टेलिव्हिजन चॅनलवर सुशांतनं अंकिताला प्रपोज केलं होतं... आणि अंकितानंही 'आय लव्ह यू गुग्गू' म्हणत सुशांतला लग्नाचं वचन दिलं होतं... या घटनेचे साक्षीदार होते प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा...

हाच व्हिडिओ आता पुन्हा एकदा वायरल होताना दिसतोय... या निमित्तानं तरी या दोघांचे बिघडलेले सूर पुन्हा एकदा जुळून येतील अशी भाबडी आशा त्यांच्या चाहत्यांना वाटतेय.