‘पीके’मध्ये आमिर खान पोलिसाच्या भूमिकेत!

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चं तिसरं मोशन पोस्टर रिलीज झालंय. यात आमिर पोलिसांच्या गणवेषात दिसतोय. याशिवाय पोस्टरमध्ये संजय दत्त सुद्धा दिसतोय. आमिर खान या गावंढळ भाषेत बोलत त्याचा परिचय करून देतो. 

Updated: Sep 16, 2014, 02:32 PM IST
‘पीके’मध्ये आमिर खान पोलिसाच्या भूमिकेत! title=

मुंबई: आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चं तिसरं मोशन पोस्टर रिलीज झालंय. यात आमिर पोलिसांच्या गणवेषात दिसतोय. याशिवाय पोस्टरमध्ये संजय दत्त सुद्धा दिसतोय. आमिर खान या भोजपुरीत बोलत त्याचा परिचय करून देतो. 

आमिर म्हणतो, कन्फ्यूज होऊ नका, हा माझा मित्र भैरो सिंह आहे. पीकेचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलंय. यापूर्वी मुन्ना भाई एमबीबीएस,लगे रहो मुन्ना भाई आणि थ्री इडियट्स हीट चित्रपट राजू इराणींनी केले आहेत. पीकेमध्ये आमिर खान आणि संजय दत्त सोबत अनुष्का शर्मा पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. 

19 डिसेंबरला पीके रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पटकथेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. कोणी म्हणतं आमिर एलियनच्या भूमिकेत आहे जो कथा सांगतोय, तर दुसरं दुसरं काही...

फिल्मच्या पोस्टरबद्दलबही वेगवेगळ्या चर्चा आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये आमिर रेल्वे ट्रॅकवर न्यूड उभा होता. त्याच्या हाती फक्त ट्रान्सिस्टर होता. नंतर सोशल मीडियावर त्याची नक्कल करून बनवलेलं पोस्टर म्हणून चर्चा होती. दुसऱ्या पोस्टरमध्ये आमिर बँडवाला म्हणून दिसला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.