अरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी!

 बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?

Updated: Feb 15, 2015, 12:02 PM IST
अरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी! title=

नवी दिल्ली:  बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?

आपण दुसरा विचार करण्याआधी आम्हीच सांगतो... दिग्दर्शक आणि बिग बॉस ८ची होस्ट फराह खान एक नव्या कुकिंग शो 'फराह की दावत'चं होस्टिंग करणार आहे. 

आपल्या शोबद्दल फराह लिहिते, फराह की दावतचं शूटिंग खूप मजेदार होतं. आलिया आणि गौतम आपले आभार.

याशोमध्ये अनेक सेलिब्रिटी फराह सोबत दिसतील. यात सेलिब्रिटीज आपल्या पाककृतीच्या जरा हटके रेसिपी करून दाखवणार आहेत.

त्याच्याच एका एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि गौतम गुलाटी आले होते. फराहनं तिघांचा फोटो ट्विटरवर तर आलियानं इंस्टाग्रामवर शेअर केलाय. बिग बॉसचा सिझन जिंकल्यानंतर गौतम गुलाटीनं आपल्याला आलियासोबत लग्न करायची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.