मुंबई: तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.
राज्यात 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान होतंय. त्यासाठी तुम्ही अकरा पर्यायापैकी कोणतेतरी एक ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.
हे ओळखपत्र चालतील
मतदान करण्यासाठी तुमच्याजवळ पासपोर्ट, वाहन परवाना, केंद्र तसंच राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचं छायाचित्र ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक, पोस्ट खात्याचं पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, आर.जी.आय.नं एन.पी.आर अंतर्गत दिलेलं स्मार्टकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाचे स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेलं सेवानवृत्तीचे कागदपत्र, निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेली प्रमाणित छायाचित्र मतदार चिठ्ठी यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.