शिवसेनेनं मागितलेले ६ महत्त्वाची खाती देण्यास भाजपचा नकार – सूत्र

शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपनंच आता काही अटी आणि शर्ती लागू केल्याचं समजतंय. शिवसेनेनं मागितलेली ६ प्रमुख खाती देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय. 

Updated: Oct 27, 2014, 11:11 PM IST
शिवसेनेनं मागितलेले ६ महत्त्वाची खाती देण्यास भाजपचा नकार – सूत्र     title=

मुंबई: शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपनंच आता काही अटी आणि शर्ती लागू केल्याचं समजतंय. शिवसेनेनं मागितलेली ६ प्रमुख खाती देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय. 

एवढंच नव्हे तर शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या समावेशास भाजप तयार नसल्याचं कळतंय. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. यापुढं भाजपशी संपर्क साधायचा नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय.

दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामध्ये म्हटलंय, राज्याच्या भल्यासाठी भाजपानं ठरवलेल्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री म्हणून साथ देण्यास तयार आहोत. मुख्यमंत्रीपदी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी कुणाचं नाव ठरवायचं याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील असंही सामनानं म्हटलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.