दुसऱ्या जनमत चाचणीत कोणाला किती मिळालाय कौल?

राज्यात सध्या वेगवेगळे निवडणूक सर्व्हे येत आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सट्टे बाजाराचेही महाराष्ट्रातील निवडणुकीकडे लक्ष आहे. सी-वोटरने, न्यूज एक्सच्या दुसऱ्या जनमत चाचणीनुसार पुन्हा एकदा भाजपला कौल मिळाला आहे. युती आणि आघाडीचा सर्वाधिक फायदा हा मनसेला होईल असे दिसत आहे.

Updated: Oct 9, 2014, 12:00 PM IST
दुसऱ्या जनमत चाचणीत कोणाला किती मिळालाय कौल? title=

मुंबई : राज्यात सध्या वेगवेगळे निवडणूक सर्व्हे येत आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सट्टे बाजाराचेही महाराष्ट्रातील निवडणुकीकडे लक्ष आहे. सी-वोटर, न्यूज एक्सच्या दुसऱ्या जनमत चाचणीनुसार पुन्हा एकदा भाजपला कौल मिळाला आहे. युती आणि आघाडीचा सर्वाधिक फायदा हा मनसेला होईल असे दिसत आहे.

दुसऱ्या जनमत चाचणीत भाजपने आघाडी घेतलेय तर काँग्रेसने दुसरं स्थान पटकावलेय. नविन चाचणीनुसार, शिवसेना-भाजप यांची युती तुटण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याचे म्हटले आहे.  

शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील समझोता संपुष्टात आल्याचा सर्वात जास्त फायदा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळत आहे. कारण मनसेला यावेळी तब्बल २१जागांवर यश मिळेल असं भाकित वर्तवण्यात आलंय.  

निवडणूक निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ जागा मिळणार नसल्याने निवडणुकीनंतरची आघाडी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरीही त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक १४५ जागांची मॅजिक फिगर गाठता येणार नाही. मात्र शिवसेना - भाजप हे पुन्हा एकत्र आले तर त्यांना सरकार स्थापनेसाठी आवश्यक १४५  चा जादुई आकडा सहज गाठता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.