जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 15, 2014, 05:42 PM IST
जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार? title=

मुंबई: आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लोढा यांनी मलबार हिल इथल्या सूर्या सोसायटीनं एक परिपत्रक काढून सोसायटीतील रहिवाशांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मतदान करणाऱ्यांसाठी मंगलप्रभात लोढा यांच्या सौजन्यानं जिलेबी-गाठियाचा नाश्ता ठेवण्यात आल्याचं सोसायटीच्या पत्रकात म्हटलं होतं.

या प्रकरणी स्थानिक रहिवाशी अॅड. मनमोहन राव यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. लोढा हे टॉवर्समधील मतदारांना ब्रेकफास्टचं अमिष दाखवून मत देण्यास सांगत आहेत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप राव यांनी केला आहे. आयोगानं याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राव यांनी केली होती. आयोगानं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.