पारदर्शी आणि राज्याला विकासाकडे नेणारं सरकार देऊ - फडणवीस

आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. त्यानंतर देवेंद्र आणि त्यांच्या कोअर कमिटीनं राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव सादर केला.

Updated: Oct 28, 2014, 08:53 PM IST
पारदर्शी आणि राज्याला विकासाकडे नेणारं सरकार देऊ - फडणवीस title=

मुंबई: आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. त्यानंतर देवेंद्र आणि त्यांच्या कोअर कमिटीनं राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव सादर केला. राज्यपाल के. विद्यासागर राव यांनीही भाजपच्या सरकार स्थापनेच्या दाव्याला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्याला पारदर्शी आणि विकासाकडे देणारं सरकार देऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर आज गोपीनाथ मुंडेंची आठवण येत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असून हे 'जनतेचं सरकार' असेल असं आश्वासन मी जनतेला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाला अनुसरुन राज्याचा कारभार चालेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदार आणि पक्ष नेत्यांचेही त्यांनी आभार मानले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.