मुंबई: पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.
सह्याद्री अतिथीगृहात जावून आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. जवखेडा हत्याप्रकरणाशिवाय दुसऱ्याही मुद्दयांवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या उसाला ३००० रुपये दर मिळावा, अशीही मागणी राज ठाकरेंनी केलीय. तसंच नाशिकला मागील ८ महिन्यांपासून आयुक्त नाहीय, त्यामुळं तिथं आयुक्त द्यावेत असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आपल्या ब्लू प्रिंटमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाबद्दल सांगितलं होतं. भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे एक प्रेझेंटेशन देणार आहेत. पर्यटन या विषयावर ज्याद्वारे राज्याचं उत्पन्न वाढू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.