मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात

भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर येतायत. आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे. 

Updated: Nov 2, 2014, 10:43 AM IST
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात title=

नागपूर: भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर येतायत. आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे. 

त्यानंतर विमानतळावरून त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणारेय. या दौऱ्यासाठी शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असून फडणवीस यांच्या घराजवळील परिसर देखील सुशोभित करण्यात आलाय. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप निश्चित झालंय. मुख्यमंत्री स्वत: आपल्याकडे गृह आणि नगरविकास खातं ठेवणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.