शिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध

शिवसेना आणि भाजपमध्ये नाव न घेता जोरदार वाकयुद्ध सुरु झालंय. २५ वर्ष जुनी असलेली युती तुटल्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. सुरुवातीला आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं सुरू केलंय. 

Updated: Oct 5, 2014, 01:25 PM IST
शिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध title=

मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये नाव न घेता जोरदार वाकयुद्ध सुरु झालंय. २५ वर्ष जुनी असलेली युती तुटल्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. सुरुवातीला आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं सुरू केलंय. 

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायवेट प्रॉपर्टी नसून ते अवघ्या देशाचं आराध्य दैवत आहेत अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. तसंच शिवजयंतीच्या निमित्ताने हप्ते गोळा करत असल्याची आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या सभेत केला. तर त्याला आता उद्धव ठाकरेंनीही नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय. 

मागील २५ वर्ष युतीत होते, तेव्हा हप्ते चालले कसे, दिसले नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्याच विचारलाय. नाव घेऊन त्यांनी टीका केली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.