सिंधुदुर्गात राडा, काँग्रेस नेत्याच्या बाईक जाळल्या

 सिंधुदुर्गात मतदानाच्या आदल्या दिवशी गालबोट लागलंय. काँग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू सावंत यांच्या बाईक्स आज पहाटे अज्ञातांनी जाळल्यायत. यासंदर्भात परब यानी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

Updated: Oct 14, 2014, 05:23 PM IST
सिंधुदुर्गात राडा, काँग्रेस नेत्याच्या बाईक जाळल्या title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मतदानाच्या आदल्या दिवशी गालबोट लागलंय. काँग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू सावंत यांच्या घरात पार्ककेलेल्या  बाईक्स आज पहाटे अज्ञातांनी जाळल्यायत. यासंदर्भात परब यानी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.  राज्याचे लक्ष लागुन असलेल्या सिंधुदुर्ग मधील मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे.

सिंधुदुर्ग म्हटला की डोळ्या समोर येतो राडा. मात्र यावेळची इथला निवडणूक प्रचार अतिशय शांततेत पार पडला असला तरी पोलिस यंत्रणेवरचा ताण मात्र कमालीचा वाढला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गात याआधी कुडाळ शहरात होंडा शोरुममधील १८ नव्या बाईक अज्ञाताने जाळल्यात होत्या. या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.