ऑडिट विधानसभा मतदारसंघ - अहेरी,गडचिरोली

 आर. आर.पाटील पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम या दोन नेत्यांमध्ये इथे संघर्ष पाहायला मिळतो. मात्र दीपक आत्राम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे आमदारकी मिळवली. 

Updated: Oct 2, 2014, 11:37 AM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - अहेरी,गडचिरोली  title=

गडचिरोली :  आर. आर.पाटील पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम या दोन नेत्यांमध्ये इथे संघर्ष पाहायला मिळतो. मात्र दीपक आत्राम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे आमदारकी मिळवली. 
 
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचं काम याच मतदारसंघात आहे. गडचिरोलीतील तिन्ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

या मतदारसंघात सुमारे २ लाख १० हजार ९९ मतदार आहेत. २००९ मध्ये राष्ट्रवादीने धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा संधी दिली. मात्र राज्यमंत्रीपदी असताना पुण्यातील चिंकारा शिकार प्रकरणामुळे आत्राम यांना राज्यमंत्रीपद गमवावं लागलं. आणि तुलनेने नवख्या असणा-या दीपक आत्राम यांनी अपक्ष निवडणूक लढवत आत्राम यांचा २५ हजार मताधिक्याने पराभव केला. अर्थात यामागे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दीपक आत्राम यांच्यामागे आपली ताकद लावल्याचं बोललं जातं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार अशोक नेते यांना या विधानसभा क्षेत्रातून ४३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्यात. 

विकासकामांबाबत ...
मोठ्या पुलांची उभारणी केली., चेन्ना सिंचन प्रकल्पाला गती, आदिवासी समाजासाठी वसतिगृहांची उभारणी केलेय. ही कामे केल्याचं दीपक आत्राम सांगतात.

नारा देत पुन्हा एकदा भावनिक नाळ जोडू पाहत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा धर्मरावबाबा आत्राम गेलेला बालेकिल्ला मिळवण्यासाठी सज्ज झालेत. 

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांच्यातल्या संघर्षाची झळ इथल्या जनतेला नेहमीच बसत आलीये. त्यामुळे इथली सर्वसामान्य जनता विकासांपासून आजही कोसो दूर आहे.

काय आहेत समस्या...
नक्षली चळवळींची दहशत कायम आहे. , अनेक भागात वीजपुरवठा नाही, सिंचन योजना नाही, मोठ्या नद्यांचा प्रदेश, मात्र सिंचनाच्या योजना नाही, रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, ना रेल्वे आली ना पूल झालेत. 

इथे आत्राम राजघराण्याची नागविदर्भ आंदोलन समिती नावाची स्वतःची प्रभावी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून मूळ राजघराणे आजवर गडचिरोली जिल्ह्यात राजकारणात सक्रिय होते. या  घराण्याचे सध्याचे वंशज राजे अंबरीशराव यांनी हवेचा रोख पाहून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

गडचिरोली जिल्हा नक्षली हिंसा आणि वनाच्छादीत भाग असल्याने देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट आहे. राजकीय लढाई म्हणायची झाली तर तीन आत्रामांच्या तुंबळ युद्धात इथला मतदार नक्की कुणाला जवळ करतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून गृहमंत्री आर आर पाटील यांनीजबाबदारी खांद्यावर घेतली. मात्र इथल्या सर्वसामान्य माणसाला त्याचा फारसा फायदा झालेला नाही. इथली नक्षली दहशत अजूनही आहे तशीच आहे. या भागात नक्षलवाद्यांसाठी परवलीचा शब्द आहे 'जंगलवाले'. ते कुणाच्या बाजूने राहतील, त्यावरही इथली राजकीय गणितं बरीच अवलंबून आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.