कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार

 कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार झाल्याची माहिती समोर आलीय. विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कैद्यांना कळंबा कारागृहात ठेवलं जातं.

Updated: Dec 15, 2016, 06:16 PM IST
कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार  title=

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार झाल्याची माहिती समोर आलीय. विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कैद्यांना कळंबा कारागृहात ठेवलं जातं.

नियमानुसार या कैद्यांना पॅरोल देण्यात येतो. मात्र मुदत संपल्यानंतर या कैद्यांनी पॅरोल संपल्यानंतर कैद्यांनी कारागृहात परतणं बंधनकारक असतं. तरीही काही कैदी कारागृहात परत येत नाहीत..

कळंबा कारागृहारातील तब्बल 52 कैदी पॅरोलवर बाहेर पडले मात्र शिक्षा भोगण्यासाठी कारागृहारात परतलेच नाहीत. कारागृह प्रशासनानं 52 कैद्यांची नावं प्रसिद्ध केलीत..

या कैद्यांबद्दल नागरिकांना माहिती मिळाल्यास कारागृह प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय.