दोन मुलांना मारून पित्याच्या आत्महत्येनं औरंगाबाद हळहळलं!

पोटच्या दोन मुलांची हत्या करून पित्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं उघडकीस आलं असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे. 

Updated: Jan 5, 2015, 05:29 PM IST
दोन मुलांना मारून पित्याच्या आत्महत्येनं औरंगाबाद हळहळलं! title=

औरंगाबाद: पोटच्या दोन मुलांची हत्या करून पित्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं उघडकीस आलं असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे. 

चौधरी कॉलनीत राहणाऱ्या या इसमानं आपल्या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ची नस कापून घेत आत्महत्या केली. त्या इसमाच्या या कृत्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरीही कौटुंबिक वादातूनतच हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.