अजित पवार कडाडले, भाजपवर हल्लाबोल तर सेनेवर गंभीर आरोप

केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारवर लक्ष्य करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी युतीवर जोरदार हल्लाबोल केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 07:34 PM IST
अजित पवार कडाडले, भाजपवर हल्लाबोल तर सेनेवर गंभीर आरोप title=

नाशिक : केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारवर लक्ष्य करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी युतीवर जोरदार हल्लाबोल केला.

 त्र्यंबकेश्वरमध्ये जाहीर सभा घेत अजित पवार यांनी युतीच्या कारभारावर तुफान हल्ला चढविला. शेतकऱ्यांचा जिल्हा असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला ग्रामीण भागात मिळू शकेल, हे पाहून राष्ट्रवादीनं त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केलीय.

. 

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील युती का तुटली याचा मोठा गौप्यस्फोट केलाय. 35 हजार कोटींसाठी युती तुटल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले  आहे.