बनावट चेकद्वारे शासनाची २२ लाख ६० हजारांची फसवणूक

 येथील  धारणी आदिवासी  प्रकल्प अधिकार्याच्या नावाचे बनावट स्वाक्षरी करुन ५ बनावट चेक द्वारे शासनाची २२ लाख ६० रुपयाची फसवणूक झाल्याची प्रकार उघडीस आलाय. यासंदर्भात धारणी प्रकल्प अधिकारी आणि अमरावती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकाने येथील  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Updated: Jan 12, 2016, 03:33 PM IST
बनावट चेकद्वारे शासनाची २२ लाख ६० हजारांची फसवणूक title=

अमरावती :  येथील  धारणी आदिवासी  प्रकल्प अधिकार्याच्या नावाचे बनावट स्वाक्षरी करुन ५ बनावट चेक द्वारे शासनाची २२ लाख ६० रुपयाची फसवणूक झाल्याची प्रकार उघडीस आलाय. यासंदर्भात धारणी प्रकल्प अधिकारी आणि अमरावती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकाने येथील  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दिनेश सुरजमल तिवारी, राकेश प्रकाश जैन आणि राजेश मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी नोव्हेंबर २०१५ दरम्यान धारणी प्रकल्प अधिकार्‍यांच्या नावे सही असलेले पाच  बनावट धनादेश व त्यावर बनावट स्वाक्षरी  केली.  आरोपींनी २२ लाख ६0 हजार रुपयांचे धनादेश आरोपींनी कॅनडा बँकेतील त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दिले. ते धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाचे असल्याने  कॅनडा बँकेकडून ते धनादेश स्टेट बँकेत वटविण्यासाठी पाठविण्यात आले.  तेथेही या पाच धनादेशाची खात्री न करता धनादेश वटवून पैसे कॅनडा बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले. 

ही बाब  धारणी प्रकल्प अधिकारी यांच्या लक्षात आली २२ लाख ६० हजार रुपये हे शासनाचे कोणाला देण्यात आले याचा तापस केला असता हा प्रकार उघडीस आला. प्रकल्प अधिकारी यांनी ही बाब अमरावती येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील प्रबंधक जयवंत वेटकर यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अमरावतीच्या सिटी कोतवाली ठाण्यात आरोपीविरुध्द तक्रार नोंदविली. 

पोलिसांनी याप्रकरणी तीनही आरोपींविरुध्द गुन्हे नोंदविले असून आरोपी फरार आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम कशी काढण्यात आली, असा प्रश्न बँक अधिकारी व पोलिसांना पडला आहे.