केबीसीनंतर औरंगाबादमध्ये 80 कोटींचा घोटाळा, दोघांना अटक

नाशिकमधील केबीसीनंतर राज्यात आणखी एक मोठा घोटाळा उघड झाला आहे.  शेकडो लोकांची कमाई पाण्यात गेली आहे. जवळपास ८० कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाल आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Jul 26, 2014, 11:23 PM IST
केबीसीनंतर औरंगाबादमध्ये 80 कोटींचा घोटाळा, दोघांना अटक title=

औरंगाबाद : नाशिकमधील केबीसीनंतर राज्यात आणखी एक मोठा घोटाळा उघड झाला आहे.  शेकडो लोकांची कमाई पाण्यात गेली आहे. जवळपास ८० कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाल आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील सुपरपॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा हा घोटाळा असल्याचे पुढे आले आहे. या कंपनीत अनेकांनी केलेली गुंतवणूक त्यांना पश्चाताप करणारी ठरली आहे. सुमारे ८० कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर कंपनीचे संचालक दीपक पारेख आणि दीव्या पारेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.

केबीसीचा कोट्यवधींचा घोटाळा राज्यात गाजत असताना संचालक असणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण यांच्याच नातेवाईकांनी हा जवळपास ८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे दिसून येत आहे. सुपरपॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, अमरावती या शहरात हजारो लोकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. ८ ते ९ हजार लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

सुपरपॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक दीपक पारेख आणि दीव्या पारेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.