औरंगाबाद पालिकेत गोलमाल, काम एकाचे पैसे दुसऱ्यालाच

औरंगाबाद महापालिकेत गोंधळ काही नवीन नाही. त्यात आता कंत्राटदारांचे पैसै देण्यातही मोठा घोळ झाल्याचं समोर येतंय. 

Updated: Mar 11, 2015, 07:48 PM IST
औरंगाबाद पालिकेत गोलमाल, काम एकाचे पैसे दुसऱ्यालाच title=

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत गोंधळ काही नवीन नाही. त्यात आता कंत्राटदारांचे पैसै देण्यातही मोठा घोळ झाल्याचं समोर येतंय. 

काम एकानं केलं आणि त्याचं पेमेंट दुस-यालाच झालंय. महापालिकेच्या काही अधिका-यांनीच हा घोळ घातल्याचा आरोप होतोय. माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीत हा गोलमाल उघड झालाय.

कुठलाही घोटाळा झाला की त्याची झळ बसते ती गरीबांनाच. असलाच काहीसा प्रकार औरंगाबाद महापालिकेत उघड झालाय. किसन नवाथे या ५५ वर्षीय कंत्राटदारानं जून २०१३ मध्ये महापालिकेकडून नालेसफाईचं कंत्राट मिळवलं होतं. महापालिकेनं तशी रितसर वर्क ऑर्डरही दिली. 

नवाथेंनी हे काम काही दिवसातच पूर्ण केलं. जवळपास १२ लाखांच्या या कामासाठी नवाथेंनी महापालिकेकडं बिल सादर केलं. मात्र महापालिकेकडून नेहमीच कामाचे पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात आली. वर्ष उलटलं तरी पैसे काही मिळाले नाहीत. नवाथेंचे महापालिकेत खेटे मारणं सुरुच होतं. त्यातच एके दिवशी नवाथेंना त्याचं पूर्ण पेमेंट झाल्याचं सांगण्यात आलं. 

पैसै तर मिळाले नाही मग ते दिले तरी कुणाला या प्रश्नानं नवाथे हैराण झाले. नवाथेंना नेमकं करावं काय हेच कळेना. महापालिका मात्र पेमेंट दिल्याचं सांगत होती. अखेर त्यांनी माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती घेतली आणि समोर आलं वेगळंच गौडबंगाल.

नवाथेंच्या साई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावानं दुसर-याच कुठल्यातरी व्यक्तीनं बँकेत खातं उघडलं आणि महापालिकेतल्या अधिका-यांनी या माणसाला पूर्ण पेमेंटही करून टाकलं. अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौकशीही सुरु केलीय. 

तर महापालिकेत असला प्रकार घडलाय यावर आता पदाधिकारीही दु:ख व्यक्त करतायत. हे प्रकरण कोर्टात गेलंय. तिथं नवाथेंना न्याय मिळेलही. मात्र मोठ्या हिमतीनं नवाथेंनी स्वत:जवळची आयुष्याची कमाई गुंतवून व्यवसाय सुरू केला होता. मात्र नशिबी आली फरपट. चूक नवाथेंची नव्हती मात्र त्यांना शिक्षा मात्र भोगावी लागतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.