औरंगाबाद : राज्यात एमआयएम हा पक्ष फोफावतोय. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे 23 नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेचं वृत्त झी 24 तासने दोनच दिवसांपूर्वी प्रसारीत केलं होतं. ते तंतोतंत खरं ठरतंय.
औरंगाबादमधे राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करणार आहेत. जुबेर लाला, अक्रम पटेल, अशोक बेरे, अफसर खान, कलिल खान या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिलेत.
राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसचेही काही नगरसेवक आणि नेते एमआयएमच्या संपर्कात आहेत. आगामी महापालिका निवडणुकांत एमआयएम चांगलीच लढत देणार असंच चित्र सध्या औरंगाबादमध्ये दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.