शेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला

शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.

Updated: Nov 7, 2015, 11:28 PM IST
शेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला title=

औरंगाबाद : शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.

खासदारांवर गुन्हा दाखल होणं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलंय. दुष्काळग्रस्त पाच हजार शेतकरी कुटुंबांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिवाळीच्या फराळ साहित्याचे वाटप करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

औरंगाबादमधील प्रातिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी फराळाच्या साहित्यासह सुगंधित साबण, उटणे, पणत्या अशी दिवाळीची भेटही दिली गेली. शेतकऱ्यांच्या घरापर्यंत हे साहित्य पोहचवलं जाणार आहे, असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.