धक्कादायक व्हिडिओ: बहिरीदेवाची यात्रा, ही श्रद्धा की अघोरी प्रथा?

एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या जत्रेत निवडुंगाच्या काट्यांनी अंगावर मारून घेण्याची अघोरी परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.  

Updated: Apr 6, 2015, 01:43 PM IST
धक्कादायक व्हिडिओ: बहिरीदेवाची यात्रा, ही श्रद्धा की अघोरी प्रथा? title=

अलिबाग: एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या जत्रेत निवडुंगाच्या काट्यांनी अंगावर मारून घेण्याची अघोरी परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.  

सध्या कोकणातील ग्रामदेवतांच्या जत्रांचा हंगाम सुरू आहे. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील बहिरीदेव त्यापैकीच एक. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी बहिरीदेवाची जत्रा भरते. या जत्रेत अंगावर काटा आणणारा प्रकार पहायला मिळतो. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक निवडुंगांच्या काट्यावर उघडया अंगानं कोलांटऊड्या मारतात किंवा निवडुंगाच्या झाडानं पाठीवर मारून घेतात. त्यामुळं आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

या निवडुंगाला स्थानिक भाषेत पेरकूट म्हणतात. गावातील आणि परिसरातील भाविक देवाला नवस बोलतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी जत्रेच्या मिरवणूकीत या निवडुंगाचे फटकारे अंगावर मारून घेतात. यामुळे अंगावर होणार्या जखमांचा भाविकांना काहीही त्रास होत नाही असा दावा केला जातो. भाविकांच्या जखमांवर गुलाल उधळला जातो. 

वर्षानुवर्षे अशा अनेक रूढी , परंपरा ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र या सगळ्या अंधश्रद्धा असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलाय.

राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा झाला खरा पण रूढी परंपरांच्या नावाखाली या अंधश्रद्धांच्या जोखडाखाली आपण किती दिवस राहाणार हाच खरा सवाल आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.